21 C
New York

MLC Election : विधान परिषद निवडणुकीत आत्तापर्यंत झालेलं मतदान किती ? आकडेवारी आली समोर

Published:

मुंबई

आज विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं निश्चित आहे. महायुतीचे (Mahayuti) 9 उमेदवार रिंगणात आहेत, तर महा विकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) 3 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या मतदानाला (MLC Election) विधानभवनात सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीच्या इतक्या आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

महायुतीला 11 पैकी 10 जागा जिंकणे सोपे आहे, परंतु क्रॉस व्होटिंग झाले तर तीन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. शरद पवार यांच्याकडे 12 आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 तर काँग्रेसकडे 38 आमदार आहेत. या 12 उमेदवारांपैकी भाजपचे पाच उमेदवार सुरक्षित वाटतात, ते म्हणजे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर. महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा 1 उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव सहज विजयी होऊ शकतात. जयंत पाटील यांना जिंकायचे असेल तर त्यांच्यासाठी मतांचे व्यवस्थापन करावे लागेल.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आत्तापर्यंत झालेलं मतदान ?

भाजप- 100

अपक्ष- 9

अजित पवार गट- 39 + अपक्ष2= 41

शिंदे गट- 30

काँग्रेस- 30

शरद पवार गट- 12

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img