19.1 C
New York

Raosaheb Danve : राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करू…; दानवेंचं मोठं विधान

Published:

विधानपरिषदेच्या (Vidhanparishad Election) 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठे विधान केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करू, असं सूचक वक्तक्य दानवेंनी केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

काल काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचे चार आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली आहे. गौरंट्याल यांनी नाव न घेता या आमदारांची माहिती दिली होती. त्यानंतर रावसाहेब दानवेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना दानवेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत घोडेबाजार वैगेर काही होणार नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असे आमचे सर्व आमदार एकत्र आहेत. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार 100 टक्के विजयी होतील. राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार, कारण त्यांच्याकडून हे होऊ शकत नाही, असं दानवेंनी म्हटलं.

काँग्रेसचे चार आमदार फुटणार?

मराठा आरक्षणाबाबत बोलताना दानवे म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय राजकारणाचा विषय होऊ नये. सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे, अशा मताचे आम्ही आहोत. राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, त्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती मिळू दिली नाही. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. पुढे आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र त्यावेळी राज्यात जे कोणी सत्तेत होते, त्यांनी आरक्षणासाठी वकिलांची फौज आणि त्यासाठी लागणारी माहिती दिली नाही. त्यामुळं ते आरक्षण रद्द झालं, अशी टीका दानवेंनी विरोधकांवर केली.

दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. आता विधानसभा निडणुकीत राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करू, असं दानवेंनी म्हटलं. त्यामुळं कोणाचे आमदार फुटणार आणि कुणाला त्याचा फायदा होईल, हे आज संध्याकाळपर्यत स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img