निर्भयसिंह राणे
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानमध्ये खेळावे अशी शाहिद आफ्रिदीची विनंती आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) विश्वास आहे कि विराट कोहलीने (Virat Kohli) चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy)2025 साठी शेजारच्या राष्ट्राला भेट दिली तर तो त्यांचा पाहुणचार पाहून आश्चर्यचकित होईल. माजी अष्टपैलू क्रिकेटरने असा खुलासा केला की विराट कोहलीचे पाकिस्तानमध्ये भरपूर चाहते आहेत आणि ते भारतीय क्रिकेट संघाच्या दिग्गज खेळाडूंना पाहून खूप आनंदित होतील.
भारत शेवटचा 2008 मध्ये पाकिस्तानात खेळाला होता, परंतु त्यांच्या तणावग्रस्त राजकीय भूमिकेमुळे परात कधीही गेला नाही. गेल्यावर्षीच्या आशिया कप स्पर्धेचा यजमानपदसुद्धा पाकिस्तानकडे होते परंतु, ACC ने हायब्रीड मॉडेलचा निर्णय घेतला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले गेले. चॅम्पियन्स ट्रॉफसाठी सुद्धा हायब्रीड मॉडेलचा निर्णय ICC घेण्याची शक्यता आहे.
आफ्रिदीने मद्यमांसमोर अस सांगितले की, “विराट कोहली जर पाकिस्तानात आला तर तो भारताचे आदरातिथ्य विसरेल. विराटाचे पाकिस्तानमध्ये भरपूर चाहते आहेत, आम्ही विराटला पाकिस्तानाध्ये खेळतांना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत.
आफ्रिदीचे पूर्व सहकारी वसीम अक्रमनेही (Wasim Akram) भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्याची उच्च व्यक्त केली आहे
“मला अशा आहे की भारत पाकिस्तानात खेळायला येईल. आमचा संपूर्ण देश सर्व संघाचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. त्यांचे भव्य स्वागत इले जाईल, आणि क्रिकेट अप्रतिम असेल” अस वसीम अक्रम म्हणाले.