Gharat Ganpati: कोकणामधील गणेशोत्सव आणि कोकणातली परंपरा हा नेहमीच जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं नातं हे अजोड आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला ना तरी एक वेगळीच ऊर्जा कोकणी माणसाच्या शरीरात येते. गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण असं की कोकणी माणसाला कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. गणपतीत आलेल्या पाहुण्यांचे नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची एक विशिष्ट अशी ओळख आहे. आता गणेशोत्सवामध्ये कोकणात होणारी मज्जा मस्ती आणि परंपरा ही आता मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, जो कोकणातली गणेशोस्तवाची झलक आणि त्याच महत्व सांगणारा चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तर आता ‘घरत गणपती’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
अनंत- राधिका यांच्या शाही विवाह सोहळ्यात अक्षय कुमार सहभागी होणार नाही
Gharat Ganpati: ‘घरत गणपती’ या चित्रपटातून एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय हाताळला गेला आहे. कोकणामध्ये गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतं. अशाचप्रकारे घरत कुटुंबही गणपतीच्या निमित्ताने या चित्रपटात एकत्र आलेलं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. गौरी-गणपतीत केली जाणारी कोकणातील मज्जा-मस्ती, मंगळागौरी, फुगड्या या सर्व परंपरा या चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. कोकणामधील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी या घरत कुटुंबात परदेशातून क्रिती अहुजा ही अमराठी मॉडर्न मुलगी येत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. यानंतर ती या कुटुंबाचा एक भाग होतं असल्याचंसुद्धा ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय. कोकणामधल्या सर्व पद्धती, परंपरा सर्व मज्जा मस्ती ती शिकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Gharat Ganpati: गणेशोत्सवाबरोबरच कुटुंबामधले मतभेद आणि हेवेदावे यांवरही ‘घरत गणपती’ या चित्रपटातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात घर नक्कीच करेल. साजेशी चार गाणी आणि संवाद यांमुळे चित्रपटाला वेगळाच टच मिळालाय. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट येत्या २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, संजय मोने, शुभांगी लाटकर, समीर खांडेकर, परी तेलंग, या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेत्री निकिता दत्ता ही या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नवज्योत बंदिवाडेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.