2.5 C
New York

Gautam Gambhir : गौतम गंभीरला टीम इंडियासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मोर्ने मॉर्केल हवा

Published:

निर्भयसिंह राणे

टीम इंडियाला T20 विश्वचषक जिंकण्यासाठी मार्गदर्शन केल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपवणाऱ्या राहुल द्रविडच्या नंतर, गौतम गंभीरने (Gautam Gambhir) कोचिंग स्टाफला बळकट करण्यासाठी बीसीसीआयकडे मांडल्या काही मागण्या.

भारतीय क्रिकेट संघाच्या नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बीसीसीआयला (BCCI) दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मोर्ने मॉर्केलला (Morne Morkel) गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाला T20 विश्वचषक जिंकण्यासाठी मार्गदर्शन केल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपवणाऱ्या राहुल द्रविडच्या नंतर, गौतम गंभीरने कोचिंग स्टाफला बळकट करण्यासाठी बीसीसीआयकडे मांडल्या काही मागण्या. यापूर्वी, असे कळण्यात आले की गंभीरने बीसीसीआयला सांगितले की त्याला स्वतःचा कोचिंग स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य हवे.

Wanindu Hasaranga : वनिंदूं हसरांगाने श्रीलंकेच्या कर्णधार पदाचा दिला राजीनामा

गौतम गंभीरने सहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून रायन टेन डोशेट (Ryan Ten Doeschate) आणि अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांची शिफारस केली. आता, भारताच्या माजी कर्णधारची इच्छा होती की मोर्ने मॉर्केल त्याच्या टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफचे भाग व्हावे. काही अहवालानुसार, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाशी चर्चा केली आहे. मोर्ने मोर्कलला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यासंदर्भात बोर्डाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी एकत्र खेळण्यापासून गौतम गंभीर आणि मोर्ने मॉर्केल एकमेकांना चांगले ओळखतात. गंभीर कर्णधार असताना मॉर्केल २०१४ ते २०१६ पर्यंत KKR कडून खेळाला. नंतर हे दोघे लखनऊ सुपर जायंट्समध्ये एकत्र आले, जिथे गंभीरने मार्गदर्शक म्हणून आणि मॉर्केलने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले.

गेल्यावर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मोर्ने मॉर्केल हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु त्यांचा PCB बरोबरचा करार संपल्याने मिकी आर्थर आणि सर्व सपोर्ट स्टाफसोबत त्यांने सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img