20.9 C
New York

Diva Dumping Ground : डम्पिंग ग्राउंड बंद करा, अन्यथा आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) दिवा डम्पिंग (Diva Dumping Ground) बंद केल्याचे सांगितले असले तरी अद्यापही दिवा-शीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकण्याचे थांबवत नसल्याने डम्पिंग सुरूच आहे. त्यामुळे पहिल्यांदा ५ लाख दिवेकारांची फसवणूक थांबवा, तसेच दिवा-शीळ रोडवर कचरा टाकणे बंद करा, अन्यथा महापालिका प्रशासना विरोधात आणि खोटी आश्वासन देऊन दिवा शहरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात दिवावासीयांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Thackeray group) दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे (Rohidas Munde) यांनी दिला आहे.

दिवा शहरात ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता, मागील जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तयार झाले, तेव्हा डम्पिंग ग्राउड बंद झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. भंडारली येथे महापालिक मार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी निधीही खर्च केला आहे. परंतु आजही दिवा शहरात मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्या चालू आहेत. असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

शिवाय ठाणे शहरातील कचरा दिवा शहरात आजही टाकला जातो. महापालिकेची आश्वासने ही निवडणूकसाठी असतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना येथील पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी महापालिका खेळत असल्याचा आरोपही केला आहे. तर, डम्पिंग बंद झाले सांगून येथील ५ लाख नागरिकांची फसवणूक करत आहात डम्पिंग बंद करतो असे सांगून ते बंद करत नाहीत. दिव्यातील पाच लाख लोकांच्या भावनाशी ठाणे महानगरपालिका प्रशासन खेळत आहे. असेही म्हटले आहे. सदर कचरा हा दिवा प्रभाग समिती स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी यांच्या आदेशाने टाकण्यात येत असून सदर कचरा हा कांदलवणात ढकलण्यात सांगितले असल्याचे महापालिकेची जेसीपी ड्रायव्हर याचे म्हणणे होते. तरी अशा बे जबाबदार स्वच्छता निरीक्षकावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img