23.1 C
New York

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Published:

गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला (Mumbai Rain) सुरुवात केली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील अनेक सखल भागात त्यामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.

Mumbai Rain सखल भागात पाणी साचायला सुरुवात

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. दादर, लालबाग, परेल, हिंदमाता, चर्चगेट, सीएसटी मुंबईतील या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर मुंबई शहरासह उपनगरातही वाढल्याचे दिसत आहे.मुंबईतील अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ, खार, मालाड या भागात दमदार पाऊस सुरु आहे. मुंबईतील अनेक सखल भागात यामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

सायन, किंग्ज सर्कल, दादर टीटी, हिंदमाता या ठिकाणी मुंबईतील मुसळधार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंधेरी, मालाड या ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला. सध्या पाण्याचे निचरा करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

नेपाळमध्ये दोन बसेसवर दरड कोसळली; 63 प्रवासी अडकले

Mumbai Rain मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्यांनी लोकलला सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुसळधार पाऊस असल्याने त्यातच मुंबई लोकल उशिराने धावत आहेत. 10 ते 15 मिनिटे उशिराने सध्या मध्य रेल्वेची वाहतूक सुरु आहे. कर्जतहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सध्या उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

Mumbai Rain पश्चिम रेल्वेही उशिराने

मुंबईत सध्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. तर हार्बर रेल्वेही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

तसेच या मुसळधार पावसाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला आहे. मुंबईतून येणारी आणि जाणारी विमाने उशिराने सुरु असल्याने प्रवाशी त्रस्त झाल्याचे दिसत आहेत.

Mumbai Rain मुंबईसह कोकणाला ऑरेंज अर्लट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img