23.1 C
New York

BIGG BOSS Marathi: ढोलताशांच्या गजरात होणार ‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर!

Published:

BIGG BOSS Marathi: टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’ (BIGG BOSS Marathi season 5) सिझन पाचवा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘बिग बॉस मराठी’चे ४ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मराठी सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, आणि निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी या शोच्या चार पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली होती. आता मराठमोळा रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आपल्या हटके अंदाजात कल्ला करायला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं सूत्रसंचालन करण्यासाठी हजर झालेला आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो
BIGG BOSS Marathi: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत होते. नव्या सूत्रसंचालकासोबत आता हा शो अजूनच मनोरंजक होणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख सूट घालून पुणेरी ढोल वाजवताना दिसत आहे.

“होणार ढोलताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर!
आज संध्याकाळी जाहीर होणार बिग बॉस मराठीची ‘तारीख’

मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी” लवकरच…
“फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर” असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय.

BIGG BOSS Marathi: हा प्रोमो पाहून बिग बॉस मराठीच्या चाहत्यांची उत्सुकता वाढलेली आहे. आज तारीख जाहीर होणार म्हंटल्यावर चाहते आनंदी झालेले आहेत. कलर्स मराठीने हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर अफलातून व्हायरल होत आहे. तसंच या प्रोमोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत प्रेम व्यक्त केलं आहे.

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं की, “आता लवकर शो सुरू करा, खूप वाट बघितली आम्ही आणि हिंदी बघून खूप कंटाळा यायला लागला आहे.” दुसऱ्याने लिहिलं की, “किती दिवस वाट पाहत हाेतो, खूप जास्त उत्सुकता”, तर अनेकांनी तारीख माहित आहे असं सांगून २६ जुलै, २७ जुलै, २८ जुलै असा अंदाज लावला आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीचे याआधी २ प्रोमो येऊन गेले आहेत. तसंच आज पाचव्या सिझनची तारीख जाहीर होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे. रितेश देशमुख नवा सीझन नवा होस्ट असल्याने त्याच्या स्टाईलने कल्ला करणार आहे असं दिसतंय. बऱ्याच कलाकारांनी या नव्या होस्टला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदनदेखील केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img