2.4 C
New York

Anant- Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाचा खर्च ऐकून व्हाल थक्क!

Published:

भारतातील सर्वात यशस्वी आणि तितकेच श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी आणि (Anant- Radhika Wedding) राधिका मर्चंट यांचा (Radhika Merchant) आज विवाह होत आहे. आता अंबानी कुटुंबातील हे शेवटचं लग्न आहे त्यामुळे अंबानी परिवार या शाही विवाह सोहळ्यात कोणतीच कसर सोडण्याच्या मनस्थितीत नाही. प्री वेडिंग पासून ते क्रुज पार्टीपर्यंत मोठ्या समारोहात कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर अखेर तो दिवस आला आहे जेव्हा राधिका मर्चंट अंबानी परिवारात दाखल होणार आहे.

आजच्या घडीला अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा देश विदेशात होत आहे. मुकेश अंबानी आपल्या मुलाच्या लग्नात पैसे खर्च करणार तरी किती असाच प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे. आता एक रिपोर्ट समोर आला असून यामध्ये म्हटले आहे की मुकेश अंबानी आपल्या मुलाच्या लग्नात नेमके किती पैसे खर्च करणार आहेत.

Anant- Radhika Wedding बाब्बो फक्त एक वेडिंग कार्ड 7 लाखांचं

अंबानी परिवाराकडून जे वेडिंग कार्ड (Wedding Card) पाठवले जात आहेत त्या एका वेडिंग कार्डची किंमत तब्बल सात लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या आधी अनंत आणि राधिका यांचे जे प्री वेडिंग फंक्शन झाले होते त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या सोहळ्यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गुजरातमधील जामनगर मध्ये हा समारोह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 350 प्लेन पाहुण्यांना घेऊन येथे पोहोचले होते. हा खर्च सुद्धा अंबानी यांनीच केला होता. या फंक्शन मध्ये लोकप्रिय पॉपस्टार रेहानाने सुद्धा हजेरी लावली होती.

अनंत-राधिकाचा लग्नमंडप पाहिलात का? व्हिडिओ आला समोर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री वेडिंग इटलीमध्ये (Italy) झाले होते. या सोहळ्यातही अनेक प्रसिद्ध मंडळी हजर राहिली होती. पाहुण्यांसाठी 12 खासगी एअरक्राफ्ट आणि लगजरी वाहनांचा बंदोबस्त करण्यात आला होता. या प्री वेडिंग पार्टीसाठी अंबानी परिवाराने 500 कोटी रुपये खर्च केले होते. अशा पद्धतीने दोन प्री वेडिंग मध्येच अंबानी यांनी तब्बल दीड हजार कोटी रुपये खर्च केले होते.

Anant- Radhika Wedding पाहुण्यांना कोट्यवधींचं रिटर्न गिफ्ट

या शाही विवाह सोहळ्यात देश विदेशातील नामवंत मंडळी हजेरी लावणार आहेत. आता इतकी प्रसिद्ध मंडळी लग्नाला येणार म्हटल्यावर त्यांना रिकाम्या हाताने पाठवणार तरी कसं? त्यामुळे या पाहुण्यांना रिटर्न गिफ्टसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचं मुकेश अंबानी यांनी ठरवलं आहे. या सगळ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कोट्यवधी रुपयांच घड्याळ मिळणार आहे. या घड्याळाची जबाबदारी स्वदेश ऑर्गनाझेशनकडे आहे. बाकीच्या पाहुण्यांना काश्मीर, बनारस आणि राजकोट येथून मागवलेल्या महागड्या वस्तू गिफ्टमध्ये दिल्या जाणार आहेत.

Anant- Radhika Wedding लग्नात तीन हजार कोटींचा खर्च

आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. या सोहळ्यात अंबानी परिवार जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. याआधी हळद आणि मेहंदीचे फंक्शन मुंबईमध्ये झाले होते. यावेळी जस्टिन बीबर हजर राहिला होता. आता या शाही विवाह सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून थोड्याच अनंत आणि राधिक विवाह बंधनात अडकणार आहेत.

Anant- Radhika Wedding जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होणार लग्न

आज अनंत आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. आज संध्याकाळी लग्न त्यांनतर उद्या शनिवारी आशीर्वाद समारोह होणार आहे. यानंतर रविवारी वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img