19.7 C
New York

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत-राधिकाचा लग्नमंडप पाहिलात का? व्हिडिओ आला समोर

Published:

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी (Anant Ambani) काही तासांतच बोहल्यावर चढणार आहे. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिका शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्याशी अनंत अंबानी लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नसमारंभासाठी आता अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे अंबानींच्या पाहुण्यांची धावपळ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी कालपासून देशातून आणि परदेशातून पाहुणे मंडळी मुंबईमध्ये दाखल होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या देशांच्या पंतप्रधानांसह हॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी मुंबईत दाखल झाले आहेत. आता अनंत-राधिकाच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून लग्नमंडपाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: नीता-मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा पार पडणार आहे. माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजता शुभ मुहूर्तावर दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. अशातच सगळेजण अनंत-राधिकाचा लग्नमंडप पाहण्यासाठी उत्सुक आहेत. लग्नमंडपाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. ‘अंबानी अपडेट’ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून NMACCमधील लग्नमंडपाचा व्हिडीओ स्टोरीमध्ये शेअर करण्यात आला आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाआधी अँटिलियावर पार पडली ‘अशी’ शिव शक्ती पूजा

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, अनंत-राधिकाच्या लग्नाचा मंडप शाही पद्धतीने सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आकर्षित विद्युत रोषणाई अतिशय सुंदररित्या केल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था ही स्टेजच्या समोरचं केली आहे. लग्नामध्ये प्रत्येक गोष्टीची बारकाईने विशेष काळजी घेण्यात आली आहे.

दरम्यान, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी खास प्रियांका चोप्रा पती निक जोनससोबत परदेशातून मुंबईत दाखल झाली आहे. याव्यतिरिक्त स्टार किम कार्दशियन आणि ख्लोए कार्दशियन या दोघी मुंबईत पोहोचल्या आहेत. बॉलीवूड्चे अनेक कलाकार या शाही लग्नसोहळ्यासाठी हजर राहणार आहेत. तसंच देशातले राजकीय नेते मंडळीदेखील अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचले आहेत.

अनंत-राधिकाच्या भल्या-मोठ्या शाही लग्नानंतर उद्या १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये निमंत्रित पाहुणे मंडळींसह रिलायन्स आणि जिओ कंपनीचे मोठे अधिकारी, कर्मचारी हजेरी लावणार आहेत. याव्यतिरिक्त १५ जुलैला रिसेप्शन पार्टी देखील असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img