पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने २०२४ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत स्वतःच्या टीमच्या प्रशिक्षकांसोबत गैरवर्तन केले अशी क्रीडा वर्तुळात चर्चा आहे.
चर्चा अशी आहे की, आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याचे आढळले. अस म्हणलं जातंय कि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना गैरवर्तन झाल्यावर सुद्धा शाहीनवर अजून कार्यवाही का नाही केली जात आहे. आफ्रिदीने प्रशिक्षकांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीची बातमी समोर आली जेव्हा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू वहाब रियाझची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीतून त्याची हाकालपट्टी करण्यात आली व नंतर त्याने मौन सोडल्यावर ही घटना समोर आली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी पृष्टि केली कि त्यांनी अब्दुल रझाक आणि वहाब रियाझ यांना सूचित केले कि त्यांच्या सेवा यापुढे राष्ट्रीय निवड समिती सेटअपमध्ये अवश्यक नाही. अब्दुल रझाक हा पुरुष आणि महिला समितीचा भाग होता तर वहाब फक्त पुरुष निवड समितीचा भाग होता.