19.7 C
New York

Sheena Bora : …अखेर शीनाच्या अस्थी सीबीआयला सापडल्या

Published:

मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध शीना बोरा (Sheena Bora) हत्याकांड प्रकरण सीबीआय मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) सीबीआय कोर्टामध्ये मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने (CBI) शीनाचे अस्थी मिळत नसल्याचा म्हटलं होतं. त्यानंतर आता ह्या अस्थी दिल्लीतील सीबीआय कार्यालयातील स्टोर रूम मध्ये असल्याचे कोर्टात म्हटले आहे.

यापूर्वी 24 एप्रिल रोजी फिर्यादी पक्षाने शीना बोराच्या अस्थी आणि अवशेष गहाळ झाल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. 10 जून रोजीसुद्धा ते सापडले नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. या अस्थिंचा शोध न लागल्याने गेल्या महिन्यात फॉरेन्सिक तज्ज्ञाची साक्ष थांबवण्यात आली होती. मात्र, एफआयआरमध्ये उल्लेख नसल्याने हे अवशेष पुरावे म्हणून सादर केले जाणार नाहीत, असे सीबीआयने स्पष्ट केले.

यादरम्यान, न्यायालयाला यासंदर्भात एक ईमेल प्राप्त झाला होता. शीना बोराच्या अस्थी गहाळ झाल्या नसून त्या एका फॉरेन्सिक तज्ज्ञाच्या ताब्यात असल्याचा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. याच तज्ज्ञाने त्याची तपासणी केली होती आणि न्यायालयात त्याने साक्षही दिली. मात्र, या साक्षीदाराने अचानक खूप संपत्ती जमा केल्याचा आरोप या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. ईमेल पाठवणाऱ्याने स्वत:ची ओळख फॉरेन्सिक तज्ज्ञाचा भाऊ म्हणून दिली आहे. तथापि, सीबीआयच्या दिल्ली कार्यालयातील स्टोअररूमची पुन्हा तपासणी केली असता तेथे अस्थी असल्याचे आढळले.

रायगडमधील पेण गावानजीकच्या जंगलातून 2012 मध्ये या अस्थी जप्त करण्यात आल्या होती. सीबीआयने त्यांचा उल्ले्ख शीना बोराचे अवशेष म्हणून केला होता. तपासणीसाठी या अस्थी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आतापर्यंत 91 साक्षीदारांची साक्ष झाली आहे. पुढील सुनावणी शुक्रवार 12 जुलै रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण

इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img