3.1 C
New York

Sharad Pawar : विधानसभेला मविआच्या 225 जागा निवडून येतील- पवार

Published:

मुंबई

विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) 225 जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.

भाजपचे उदगीर मतदार संघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश झाला. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे, असच सगळ्यांना वाटत आहे. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे.. एक उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला.

शरद पवार म्हणाले की, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे. हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो.. सुधाकर भालेराव आणि इतर नेते पक्षात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img