23.1 C
New York

Rohit Sharma: सपोर्ट स्टाफच्या बोनसवर रोहित झाला नाराज, केली ही कृती

Published:

निर्भयसिंह राणे

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर, कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) आपला चांगुलपणा दाखवत तो भारताला T-20 विश्वचषक जिंकण्यात मदत करणाऱ्या सपोर्ट स्टाफसाठी BCCI कडून मिळालेले 5 कोटींचा बोनस बक्षिस देण्यास तयार होता. 2024 च्या विश्वचषक विजयानंतर सपोर्ट स्टाफला दिलेल्या बोनसवर रोहित शर्माने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि सपोर्ट स्टाफचे बक्षीस वाढवून स्वतःच्या बक्षिसातले 5 कोटी देण्यात यावे ह्यावर त्याने माध्यमांसमोर माहिती दिली.

BCCI ने भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकल्यानंतर बोनस म्हणून 125 कोटींची घोषणा केली, जी T20 विश्वचषक 2024 ला ICC कडून मिळालेल्या बक्षिसापेक्षा 6 पट अधिक आहे. बोर्डाने BCCI ला पृष्टि केली की भारतीय संघातील 15 खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये , तर कोचिंग स्टाफला प्रत्येकी 2.5 कोटी आणि रिजर्व खेळाडूंना 2 कोटी रुपये दिले जातील.

गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

तत्पूर्वी, राहुल द्रविडने BCCI ला 5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम कमी करून उर्वरित कोचिंग स्टाफसाठी सामान बोनस म्हणून 2.5 कोटी करण्याची मागणी केली होती. अश्याच पद्धतीची कृती भारतीय कर्णधार रोहित शर्माने सुद्धा केल्याबद्दल त्याच्याबद्दल जागतिक प्रेक्षकवर्गात खूप सन्मान व आदर पाहायला मिळतोय.

भारतीय क्रिकेट संघाला T-20 विश्वचषक जिंकून दिल्यावर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T-20 मधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे, तो श्रीलंकेविरुद्ध टी-२० मध्ये खेळणार नाही पण येत्या २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी व सर्व एकदिवसीय आणि कसोटी सामने तो कर्णधार म्हणून खेळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img