3.8 C
New York

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांची PMO कडून दखल

Published:

पुणे

पुणे जिल्ह्यातील (Pune) प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कारनाम्यांची पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) दखल आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चांगले चर्चेत आहे. पूजा खेडकर यांचे पुण्यातून वाशिम मध्ये बदली झाली आहे. मात्र आता पूजा खेडकरने भारतीय प्रशिक्षक सेवेमध्ये स्थान मिळवण्यासाठी शारीरिक अपंगत्व श्रेणीचे व इतर मागासवर्गीय कोट्यातील नावाचा गैरवापर केला आहे. आता या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. तर दुसरीकडे आजच पुण्यातून बदली झाल्यानंतर पूजा खेडकर यांनी वाशीम येथे पदभार स्वीकारला आहे. मात्र आता पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवला आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने महाराष्ट्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्याबद्दल अहवाल मागवला आहे. बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने अहवाल तपासून अंतिम रिपोर्ट यूपीएससी यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. आयएएस होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचे प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी दिले होते. त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पूजा खेडकर यांचे एकएक कारनामे समोर येताच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून तडकाफडकी त्यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस म्हणून बदली करण्यात आली. आज पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. त्यांनी जिल्हाधिकारी एस. बुवनेश्वरी यांची भेट घेतली. मीडियातून होत असलेल्या आरोपावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी आरोपाबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराईज नसल्याचे स्पष्टीकरण दिले. वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंद आहे. पुढील वर्षभर काम करत राहील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img