रमेश औताडे, मुंबई
राज्यभरातील रुग्णालयात साफसफाई व रुग्णाची स्वच्छता करणाऱ्या महिला परिचर (Hospital Cleaner) अवघ्या तीन हजार वेतनावर आठ काम करत आहेत. या अन्यायाविरोधात त्यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात संभाजी सेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकुमार सवडतकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे.
कायम सेवत करा व किमान वेतन, अपघात विमा, पेन्शन, भाऊबीज भेट, दरवर्षी गणवेश, कार्यक्षेत्रात प्रवासभत्ता या व इतर मागण्या सरकारकडे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. मात्र सरकार आश्वासन देते मात्र अंमलबजावणी करत नाही असे सांगत महिला प्रदेश आघाडी कार्याध्यक्ष रेखा पाटील यांनी सरकारला आता हे चक्री उपोषण तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.