20.2 C
New York

EURO Cup : नेदरलँड्सला हरवत इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश, नेदरलँड्सच्या चहात्यांचा पबवर हल्ला

Published:

इंग्लंडने (England) युरो कप 2024 (EURO Cup) मधील दुसऱ्या उपांत्य (Semi Final) सामन्यात नेदरलँड्सचा (Netherlands) पराभव करत सलग दुसऱ्यांदा युरो कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर इंग्लंडने प्रथमच देशाबाहेर आयोजित केलेल्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. 

डच फुटबॉल चाहत्यांनी गुरुवारी इंग्लंडकडून युरो २०२४ च्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर पबमध्ये असलेल्या इंग्लिश चाहत्यांवर हल्ला केला. सोशल मीडियावर वायरल झालेल्या विडिओमध्ये, ब्रिटिश अधिकारी हल्ला नियंत्रणास आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. हॅरी केनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने नेदरलँड्सवर २-१ ने मात करत युरो २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ७ व्य मिनिटाला नेदरलँड्सने गोल मारून लीड घेतली, तर १८ व्या मिनिटाला हॅरी केनने पेनल्टी गोल मारून बारोबारी साधली. तरीही मॅचच्या शेवटच्या मिनिटांपूर्वी ओली वॅटकिन्सने इंग्लंडसाठी एक आस निर्माण केली.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने वॅटकिन्सनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि दावा केला कि तो या यशासाठी पूर्णपणे पात्र आहे.ओलि ने जे धीर धरून कमबॅक केले त्याचे कर्णधार हॅरी केनला खूप आनंद वाटले.

दरम्यान डच कर्णधार व्हर्जिल व्हॅन जिक खूपच अस्वस्थ होता आणि इतके करूनही जिंकू न शकले हे निराशाजनक होते.” माझ्याकडे या बद्दल काही शब्द नाहीत. जेव्हा आपण एवढा उशिरा गोल मारण्याची संधी सामोच्याला देतो तेव्हा जास्त वाईट वाटतं” असं डच कर्णधार व्हर्जिल व्हॅन जिक म्हणाला .

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img