8.3 C
New York

Disha Salian Death Case : दिशा सालियन प्रकरणात, भाजप नेता?

Published:

मुंबई

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Nane) यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीमार्फत (SIT) सुरु आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार असून दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. तसेच आपल्याकडे पुरावे असल्याचेही राणे म्हणाले होते. त्यानंतर आता याप्रकरणी नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

गँगरेप करून दिशा सालियानचा मर्डर करण्यात आला. माझ्याकडे या संदर्भात सर्व पुरावे आहेत. आजही दिशा सालियनचे आरोपी विधान भवनात फिरत आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात मुंबई पोलीस आयुक्तांवर प्रेशर होता. डीसीपींवर प्रेशर होता. आदित्य ठाकरे 8 जून आणि 13 जूनला पार्टीत उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून सर्व काही लपवण्यात आलं आहे असा आरोप नितेश राणे यांनी केलाय.

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आम्हाला यापूर्वी बोलावलं होतं. मी मुबंई पोलिसांना सर्व योग्य ते पुरावे देणार आहे. काही महत्त्वपूर्ण पुरावे आदित्य ठाकरे संदर्भातही मुंबई पोलिसांना मिळाले आहेत असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. आता सरकार महायुतीच आहे. आम्ही पुण्याच्या अग्रवालला सोडलं नाही. मिहिर शाहाला सोडलं नाही आणि आदित्य ठाकरे यांनाही सोडणार नाही असंदेखील नितेश राणे यावेळी म्हणाले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img