8.4 C
New York

Worli Hit and Run : शिवसेना उपनेते पदावरून राजेश शहा यांची हकालपट्टी

Published:

मुंबई

मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit and Run) कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणाऱ्या मिहीर शहा (Mihir Shah) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. अपघात झाल्यानंतर मिहीर शहा फरार होता. मिहीरचे वडील राजेश शहा (Rajesh Shah) हे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. राजेश शहा यांनीच मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केल्याने ते पोलिसांच्या रडारवर आले होते. त्यामुळे विरोधकांकडून राजेश शहा यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) वतीने ने त्यांची उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

वरळीत अपघात झाल्यानंतर मिहीरने त्याचे वडील राजेश शहा यांना अटक केली होती. त्यांनीच मिहीरला तू पळून जा अपघात (Worli Accident) चालकाने केला आहे सांगू, असा सल्ला दिला होता. यानंतर राजेश शहा यांना मिहीरने ज्या बीएमडब्ल्यू गाडीने वरळीत कावेरी नाखवा यांना चिरडले, ती गाडीच नष्ट करायची होती. जेणेकरुन मिहीर शहा याच्याविरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता.

अपघातावेळी मिहीर गाडी चालवत होता. मात्र राजेश शहा यांनी सर्वप्रथम त्यांचा चालक राजऋषी बिडावत याला अपघाताची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेण्यास सांगितले. त्यानंतर राजेश शहा घाईघाईने कलानगर येथे पोहोचले. याठिकाणी आल्यानंतर राजेश शहा यांनी फोन करुन एक टोईंग व्हॅन बोलावून घेतली. यादरम्यान राजेश शहा यांनी मिहीरच्या गाडीची ओळख कोणालाही पटू नये, यासाठी गाडीवरची नंबरप्लेट काढून टाकली. राजेश शहा हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे मिहीरच्या गाडीवर शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेला धनुष्यबाणही होता. ते चिन्हही राजेश शहा यांनी गाडीवरुन झटपट काढून टाकले. यानंतर राजेश शहा टोईंग व्हॅनची वाट बघत असतानाच मुंबई पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने माग काढत गाडीपर्यंत पोहोचले आणि राजेश शहा यांची सगळी योजना फसली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img