मुंबई
वरळीमध्ये (Worli) एका कारने दुचाकीला धडक दिली होती.दरम्यान या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ज्याच्याकडून हा अपघात झाला होता, तो काही दिवस फरार होता.त्या आरोपीला शहापूरमधून पोलिसांनी अटक केली. या हिट ॲण्ड रन (Worli Hit And Run) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah) अखेर 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी (Police Remanded) सुनावण्यात आली आहे. शिवडी कोर्टाने हा निर्णय दिला आहे.पोलिसांनी मिहीरसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. आणि अखेर मिहीरला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर त्यावेळी गाडी चालवत असलेला मिहीर शाह फरार होता. मिहिर शाहच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 11 पथके स्थापन केली होती. अखेर मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शाहला शाहपूर येथून अटक केली. त्यानंतर त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने 16 जुलै पर्यंत मिहीर शाहला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 12 जणांमध्ये आरोपी मिहीर शाहच्या आईचा आणि बहिणीचा देखील समावेश आहे. या 12 जणांनी आरोपी मिहीर शाहला पळून जाण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशी दरम्यान मिहीर शाह याने कबुली देत म्हटले आहे की अपघातावेळी गाडी तो स्वतः चालवत होता. तर, बहिणीने म्हटलं की, या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भीतीने आम्ही घर सोडले.