21 C
New York

Sanjay Raut : वरळी हिट अँड रन प्रकरणी, राऊतांचे मोठे विधान

Published:

वरळी (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणानं (Hit And Run Case) संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला. महिलेला आपल्या महागड्या गाडीनं एकदा नाहीतर दोनदा चिरडणाऱ्या मिहीर शाह (Mihir Shah) याला बेड्या घालण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल तीन दिवसांनी पोलीस आरोपी मिहीर शाहपर्यंत पोहोचले. अशातच, आता ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई पोलिसांकडेही संशयानं बोट केलं आहे. मिहीर शाह अपघातावेळी ड्रग्जच्या नशेत होता, हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून तीन दिवसांपर्यंत त्याला फरार करण्यात आलं, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, यावरुन मुंबई पोलिसांवरही संशयाची सुई येते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत वरळी हिट अँड रन प्रकरणी बोलताना म्हणाले की, “सरकारकडून वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींनी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हिट अँड रनचं प्रकरण साधंसुधं प्रकरण नाही आहे. पुण्यात जसं झालं अग्रवाल कुटुंबाचं प्रकरण, तसेच हीसुद्धा ‘नेता फॅमिली’ आहे. हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आहेत, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. तसेच, आरोपीचे वडील शिवसेना शिंदे गटाचा नेता आहे. त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड जर पोलिसांकडे नसेल, तर आम्ही तो पाठवतो.

Sanjay Raut मुख्य आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय कसे झाले? : संजय राऊत

“अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, काय करतात? एवढ्या महागड्या गाड्या कशा येतात? याचा हिशोब मुंबई पोलिसांना आता करावा लागेल. मुख्य आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय कसे झाले? तुम्हीही बोरिवली पोलीस स्टेशनला जाऊन सगळा रेकॉर्ड चेक करा. मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतोय, मुख्य आरोपींच्या वडीलांचा रेकॉर्ड सर्वांसमोर आणा.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

वरळी हिट अँड रन प्रकरणी विरोधी पक्षनेत्याची सरकारकडे ‘ही’ मागणी

Sanjay Raut नशेत एका निरपराध महिलेला चिरडलंय या लोकांनी, एकदा नाही तर वारंवार चिरडलंय : संजय राऊत

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर कोणत्या प्रकारचे लोक बसले आहेत, हे समजेल. हा मुलगा ड्रग्जच्या नशेत होता. हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून तीन दिवसांपर्यंत त्याला फरार केलं होतं. त्यानंतर त्याला सर्वांसमोर आणलं आणि अटक केली गेली. यावरुन मुंबई पोलिसांवरही संशयाची सुई येते. नशेत एका निरपराध महिलेला चिरडलंय या लोकांनी. एकदा नाही तर वारंवार चिरडलंय. रस्त्यावर फेकून देऊन पुन्हा चिरडलंय. हा खूपच अमानुष प्रकार आहे. त्यामुळे अशी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटली नाही पाहिजे. आणि जर सुटलीच तर रस्त्यावर उतरुन लोकांनी जाब विचारला पाहिजे मुंबई पोलिसांना आणि मंत्रालयात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे.”, असं संजय राऊत म्हणाले.

“वरळी हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून होत होता. कारण त्याचे वडील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत. खूपच पैसेवाला माणूस आहे, तुम्ही त्याचे रेकॉर्ड चेक करू शकता. पैसे कुठून येतात आणि काय आहे? हे समजेल. त्यात ठाणे जिल्ह्याचा आहे, त्यामुळे तुम्ही समजून जा, कोणाशी कसे आणि काय संबंध आहेत.”, असं संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img