18.8 C
New York

Unnao Road Accident : उत्तर प्रदेशात बसचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू

Published:

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao Road Accident) ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 19 जखमी झाले. मृतांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. डबल डेकर बस दूध कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात आहे. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बांगरमाऊ कोतवालीजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगाने आलेल्या बसने दुधाच्या कंटेनर मागूच्या बाजूने जोरदार धडक दिली. अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची मिळताच बेहटा मुजावर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व जखमींना बाहेर काढून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उन्नावचे पोलीस अधीक्षक, इतर अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img