Bad Newz: अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या (Trupti Dimri) ‘एनिमल’ (Animal) या चित्रपटानंतर तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. या चित्रपटात तृप्तीने रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अनेक बोल्ड सीन्स दिल्याने ती जास्तच चर्चेत आली होती. एनिमलनंतर आता तृप्तीच्या आगामी ‘बॅडन्यूज’ (Bad Newz) चित्रपटाची चर्चा जोरदार रंगली आहे. चित्रपटात तृप्ती विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतंच ‘बॅडन्यूज’ या चित्रपटातलं एक ‘जानम’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय, ज्यात विकी कौशल आणि तृप्ती डिमरी आहेत. ‘जानम’ या गाण्यामुळे तृप्तीला ट्रोल केलं गेलंय.
Bad Newz: ‘बॅडन्यूज’ या चित्रपटात ‘जानम’ या गाण्यात दोघांची अफलातून केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्यात दोघे रोमान्स करताना दिसत आहेत. विकी-तृप्तीची चित्रपटातली जोडी प्रेक्षकांना तर आवडली आहे, मात्र या गाण्यामध्ये काही इंटिमेट सीन्स दिल्याने तृ्प्ती डिमरीला नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रमाणात ट्रोल केलं आहे. तृप्तीची तुलना नेटकऱ्यांनी सनी लिओनी, राखी सावंत, मल्लिका शेरावत यांच्यासोबत केली आहे. विकीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यावरच नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
“फक्त दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो मात्र, आता…”,करण जोहरचा मोठा खुलासा
Bad Newz: एकाने कमेंटमध्ये लिहिलं की,”तृप्ती डिमरी अभिनेत्री नसून नवीन मल्लिका शेरावत आणि सनी लिओनी आहे”, दुसऱ्याने लिहिलं, “तृप्तीसाठी खूप वाईट वाटतंय ती एक उत्तम अभिनेत्री आहे. एनिमलमुळेच लोकांना वाटतंय की ती फक्त हेच करू शकते”, तर तिसऱ्याने लिहिलं की, “तृप्ती डिमरी आता मल्लिका शेरावत का बनतेय?” अशा कमेंट्स तृप्ती डिमरीला या गाण्यावर येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, तृप्ती डिमरी आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट ‘बॅडन्यूज’ हा येत्या १९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातलं पहिलं गाणं ‘तौबा तौबा’ ही प्रचंड हिट ठरलं होतं. ‘तौबा तौबा’ या गाण्यामधल्या विकीच्या डान्सचं कौतुक होत असून ह्या गाण्याची हुक स्टेप व्हायरल होताना पाहायला मिळतेय.