3.5 C
New York

Surya Grahan 2024  : ‘या’ दिवशी दिसणार यंदाच्या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण

Published:

8 एप्रिल 2024 रोजी यंदाच्या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण झाले. (Surya Grahan 2024) आता यावर्षीच्या दुसऱ्या सूर्यग्रहणाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे. अनेक भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण अत्यंत खास आहे. या सूर्यग्रहणात दिवसाला अंधार पडणार आहे. हेच नाहीतर काही तास हे सूर्यग्रहण राहणार आहे. सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते. 2024 मध्ये एकूण 4 ग्रहणे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एक सूर्यग्रहण अगोदर झाले असून हे सूर्यग्रहण दुसरे असणार आहे. सूर्यग्रहणात चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये जातो तेव्हा यावेळी सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही आणि दिवसाला देखील संपूर्ण काळोखा म्हणजेच अंधार होतो. याच सर्व घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. या सूर्यग्रहणाच्या काळात एक वेगळा अनुभव मिळतो. या सूर्यग्रहणामुळे सौरऊर्जा निर्मितीचे मोठे नुकसान हे होऊ शकते आणि सूर्यग्रहण कधीही थेट पाहून नये.

यंदाच्या वर्षीचे हे दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी दिसणार आहे. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण तब्बल 6 तास राहणार आहे. सकाळी 11 ला अमेरिकेत हे सूर्यग्रहण साधारणपणे सुरू होईल आणि संध्याकाळी 5 ला संपेल. भारतीय वेळेनुसार रात्री 9.13 ते 3.17 पर्यंत राहणार आहे. यावेळी रात्री पूर्णपणे अंधार पडेल. हे सूर्यग्रहण अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, ब्राझील, पेरू, चिली, बेट, अर्जेंटिना, मेक्सिको, फिजी, अंटार्क्टिका याठिकाणी दिसणार आहे. हे सूर्यग्रहण अमेरिकेसह अनेक इतर देशांमध्ये दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये. 5 महिन्यांनंतर 2024 मधील हे दुसरे सूर्यग्रहण होणार आहे. 8 एप्रिल 2024 रोजी झालेले सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. सूर्यग्रहण काळामध्ये अनेक शुभ कार्य केली जात नाहीत.

मराठवाडा भूकंपाने हादरला

आपल्या डोळ्यांचे सूर्यग्रहण थेट पाहण्याने नुकसान देखील होऊ शकते. यामुळेच तज्ज्ञ थेट डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्यास मनाई करतात. यामुळे आपल्या डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. सूर्यग्रहणाबद्दल नेहमीच लोकांमध्ये मोठे कुतूहल बघायला मिळते. सूर्यग्रहणाचा दिवस शास्त्रज्ञांसाठी देखील अत्यंत मोठा असतो. अनेक बदल ग्रहणाच्या वेळी बघायला मिळतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img