Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक होस्टेलमधला अक्षरशः किळसवाणा प्रकार समोर आलाय; जो पाहून तुम्हालासुद्धा किळसच येईल. या होस्टलमधील जेवणाच्या टोपात एक जिवंत उंदीर तरंगताना दिसत आहे. हा प्रकार समोर पाहून होस्टेलमधल्या जेवण खाणाऱ्या विद्यार्थ्यानाही मोठा धक्का बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ह्या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच होस्टमधील जेवणाच्या दर्जावर आता प्रश्न उपस्थित केला आहे.
चटणीत तरंगला जिवंत उंदीर
Viral Video: हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTUH)च्या हॉस्टेलमधील हा व्हिडिओ असल्याचं म्हंटल जातंय. या हॉस्टेलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मेसमध्ये हे जेवण दिलं जात होतं. यावेळी तिथल्या एका मोठ्या टोपामध्ये चक्क जिवंत उंदीर तरंगताना दिसला. या चटणीच्या मोठ्या टोपात जिवंत उंदीर बाहेर जाण्यासाठी उडी मारत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. हा व्हिडिओ ८ जुलैचा असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका टोपात हिरव्या रंगाची चटणी ठेवली आहे. त्याच चटणीमध्ये एक लहान उंदीर तरंगतोय. उंदीर टोपातून बाहेर जाण्यासाठी इकडून-तिकडून त्या चटणीमध्ये उड्या मारत असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी काही विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. मेसमधील जेवणामध्ये उंदीर पाहून अनेक जणांनी हॉस्टेल प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हॉस्टेलच्या मेसमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा
Viral Video: होस्टेलमधल्या मेसमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा किळसवाणा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून युजर्ससुद्धा तीव्र संताप व्यक्त करीत आहे. एका युजरने लिहिले की, “उंदरासाठी हे स्विमिंग पुलंसारखं आहे. मज्जा राहू हे बाजूला, पण प्रशासनाने चौकशी करून कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी”. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हैदराबादमधील ८० टक्के रेस्टॉरंटमध्ये अशाच प्रकारे जेवण बनवलं जातं.
मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करू नका, वडेट्टीवारांचा सरकारला इशारा
पुढे युजरने लिहिलं की, चटणीमध्ये उंदीर सापडणं हे अतिशय धोकादायक आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. यावर आणखी एका युजरने तक्रार केली की, जर जेवणाच्या दर्जाबाबत कोणी तक्रार केली, तर त्याला हॉस्टेल सोडण्यास सांगण्यात येत. पण जेव्हा हॉस्टेल सोडून जाण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा त्याला त्याची अनामत रक्कम परत दिली जात नाही. जर हॉस्टेलमध्येच अशा प्रकारे जेवण दिलं जात असेल, तर विद्यार्थ्यांनी कुठे जायच, काय करायचं? आणि रोज बाहेर जाऊन खाऊ शकत नाही. अजूनही हा प्रकार सुरु आहे याचं वाईट वाटत.