3.8 C
New York

Nana Patole : अंबानीचे कर्ज माफ करू शकता, मग सर्वसामान्यांचे का नाही ?

Published:

रमेश औताडे, मुंबई

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांचे 5 हजार कोटी कर्ज माफ करणारे सरकार सर्वसामान्य जनतेला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहे. कर्जमाफी दूरच मात्र दिलेली आश्वासनही पाळत नाही. तीन महिन्यात माहाविकास आघाडीचे सरकार आले की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार. असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांना दिले.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात राज्य परिवहन कामगार, अंगणवाडी, आशा सेविका, गट प्रवर्तक, बचत गट प्रशिक्षण देणारे उमेद चे कामगार, शिक्षक, असे अनेक घटक आपल्या मागण्या घेऊन आले आहेत. सर्वांनी आप आपले मंडप टाकले आहेत. नाना पटोले प्रत्येक मंडपात जाऊन आश्वासने देत टाळ्या घेत आहेत.

भर पावसात चिखल झाला आहे. माश्या घोंगावत आहेत. मेट्रो चे बांधकाम व मुलांचा क्रिकेट सराव सुरू असल्याने मैदान अपुरे पडत आहे. त्यामुळे दाटीवाटीने आंदोलनकर्ते एकच गर्दी करून मैदानात आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आले आहेत. अधिवेशन जस जसे संपत जाते तस तसे आंदोलनकर्ते गर्दी करत असतात. आता या सरकारचे काही खरे नाही. त्यामुळे मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनकर्ते राज्यभरातून आले आहेत.

सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत महिला आक्रमक झाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मैदानात महिलांनी आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. सरकारने आता आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी निवडणुकीत मतपेटीतून आम्ही काय करू ते कळेलच असा इशारा यावेळी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img