मराठवाड्यात आज काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्याची घटना घडली आहे. यामध्ये हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यांचा सहभाग आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. (Marathwada) भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आलेलं आहे. (Earthquake) हिंगोलीतल्या औंढा, हिंगोली, वसमत हा भाग भूकंपाने हादरला.
Earthquake केंद्रबिंदू हिंगोलीत
याचदरम्यान, नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला असून सकाळी 7 वाजून 14 मिनिटाला हा धक्का जाणवला. 4.2 Richter scale भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात दाखवत आहे. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकजण या धक्क्यामुळे घराबाहेर पडले होते. तसंच जिल्ह्यातील इतरही भागामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
‘या’ रेल्वे स्थानकांचे नाव बदलणार विधान परिषदेत ठराव मंजूर
Earthquake ७.१५ ते ७.१८ मिनिटांनी भूकंप
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास धक्के बसल्याचा नागरिकांचा दावा आहे. तर, दुसरीकडे जालन्यातल्या काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यात काही गावांमध्ये सकाळी ७.१५ ते ७.१८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचं नागरिकांनी सांगितलं.
Earthquake परभणीतही सौम्य धक्का
परभणीत भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचं केंद्र हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून, या भूकंपाचे धक्के परभणी जिल्ह्यातील अनेक भागात जाणवले. त्यामुळे नागरिक भीतीने घरबाहेर पडले. धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे.