4 C
New York

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेंना मोठा इशारा

Published:

मुंबई

मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती शांतता रॅली सुरू झाल्यापासून मनोज जरांगें पाटील (Manoj Jarang Patil) सातत्यांने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर टीका करत आहेत. आज धाराशिवमध्येही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुमच्यावर वाईट वेळ येईल, असा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, देशात केवळ मराठ्यांच्याच सरकारी नोंदी आहेत. मुख्यमंत्री साहेब, एकही नोंद रद्द केली तर याद राखा. तुमचे 288 आमदार पाडले म्हणून समजा असा मोठा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा शिंदे सरकारला दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आज धाराशिवच्या सभेत मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला त्या वळणावरती नेवू नका. छगन भुजबळ यांना समझवून सांगा. धनगर बांधवाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. छगन भुजबळ यांचं ऐकू नका, ते दिशाभूल करतात. थोडं थांबां तुमचा कार्यक्रमच करतो, असा धमकी वजा इशारा भुजबळांना दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण द्वेष पसरवू नये. 1974 ला ओबीसी समाजाला 16 टक्के आरक्षण मिळालं आणि आम्ही एकत्र आलो की तुम्ही जातीयवादी म्हणून डाग लावता. अंतरवालीत शांततेत आंदोलन सुरू होत, मात्र आमच्यावर लाठीचार्ज झाला. देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळ यांना बळ देवू नका. भुजबळ यांच्या नादी लागून तुमच्यावर वाईट वेळ येईल. त्यांचं न ऐकता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली.

मनोज जरांगे म्हणाले की, भुजबळच्या नादात तुमच्यावर वाईट वेळ येईल. ओबीसी मतांची गरज आहे म्हणून ओबीसीला जवळ कराल. पण भुजबळचं ऐकून तुम्ही भाजपचं नुकसान करून घेऊ नका. मी लोकसभेला केवळ पाडा म्हणालो. आता नाव घेऊन बोललो तर अवघड होईल. सन्मान घ्यायला दुसऱ्याचा सन्मान करावा लागतो. मराठ्यांची सत्ता येणार आणि त्यावेळी जातीवादी अधिकाऱ्यांचा हिशोब होणार म्हणजे होणार. जातीवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणून बसवले. ज्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याऐवजी बढती दिली”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे म्हणाले की, राज्यातील एकही नोंद रद्द होऊ द्यायची नाही. जर एक जरी नोंद रद्द झाली तर रस्ता जाम करा. महाराष्ट्रातील सगळे रस्ते जाम करा. गोरगरीब मराठ्यांना गावखेड्यात अन्याय सुरू झालाय. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होत असेल तर तो आडवा. काही नाही करता आले तर किमान तिथे जाऊन उभे राहा म्हणजे पुढच्या वेळी होणार नाही”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या नागरिकांना आवाहन केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img