5.3 C
New York

Reservation : ओबीसी आणि मराठा आरक्षणावर ‘वंचित’कडून भूमिका स्पष्ट

Published:

मुंबई

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीच्या (OBC) प्रवर्गातून आरक्षण (Reservation) मिळावं, याविषयावर महाराष्ट्र शासनाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या चर्चेच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्यावतीने (Vanchit Bahujan Aaghadi) भूमिका मांडण्यात आली की, ओबीसीचे आरक्षण हे वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षण (Maratha Reservation) हे वेगळे असले पाहिजे. असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) हे उपस्थित नव्हते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली की, सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून प्रत्येक पक्षाची ओबीसी आरक्षण प्रश्नी भूमिका काय आहे? ती लिखित स्वरूपात देण्यात यावी, अशी बैठकीमध्ये मागणी मान्य करण्यात आली. आणि आम्ही असे मानत आहोत की, ज्या प्रश्नावरून महाराष्ट्रात दुभंगला असा आहे, कदाचित त्यासाठी एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू होईल अपेक्षा करूयात की, सर्वजण आपापली भूमिका या प्रश्नावर ती स्पष्टपणे मांडतील.

राज्य सरकारने ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल सह्याद्री अथितीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img