3.2 C
New York

Reservation : विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधकांत धुमश्चक्री

Published:

मुंबई

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) अकरावा दिवस वादळी ठरला आहे. आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरून दोन्हीही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायाला मिळाला. मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला मविआच्या नेत्यांनी दांडी मारली होती. हाच धागा पकडत सत्ताधारी आमदारांनी महाविकास आघाडी (maha Vikas Aghadi) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विरोधात आहे. त्यांना मराठा-ओबीसी (OBC) ही समस्या सोडवायची नसून हा मुद्दा धगधगता ठेवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजायची आहे, असा आरोप सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केला. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहे. यानंतर काहीवेळातच विरोधकांनी विधानपरिषदेत (Vidhan Parishad) ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा उपस्थित करत हा हिशेब चुकता केला.

ओबीसी आणि मराठा आरक्षणासंबंधीची बैठक सभागृहात का घेतली नाही असा सवाल विरोधी आमदारांनी उपस्थित केला त्यावर सत्ताधारी पक्षांचे आमदार आक्रमक झाले. बैठकीला उपस्थित राहिले नाहीत म्हणून सत्ताधारी आमदारांकडून जोरदार गोंधळ घालण्यात आला. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात थेट मार्शल्सनाच पाचारण केले. परंतु मार्शल काही सभागृहात आलेच नाहीत. यानंतर परिस्थिती बिघडू नये यासाठी आमदारांना ठराविक अंतरावर उभे करण्यात आले. इतके केल्यानंतरही गोंधळ काही थांबला नाही. त्यामळे गोऱ्हे यांनी नाईलाजाने सभागृहाचे कामकाज एक दिवसासाठी तहकूब केले. अधिवेशनाच्य अकरावा दिवसांत मार्शल्सना बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती.

उपसभापतींनी सभागृहात मार्शल्सना पाचारण केल्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार गोंधळ सुरुच राहिला. याच गोंधळामध्ये  उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुरवण्या मागण्या मंजूर करत कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विरोधकांनी सभागृह डोक्यावर घातले, त्याला सत्ताधारीही तितक्याच त्वेषाने प्रत्युत्तर देत होते. अखेर वाढता गोंधळ पाहता नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधानपरिषद सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img