21 C
New York

Mahadev Betting App : अभिनेता साहिल खानला जामीन मंजूर

Published:

मुंबई

महादेव बेटिंग अँप प्रकरणात (Mahadev Betting App) अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) मनी लॉन्ड्रींच्या प्रकरण ईडीने (ED) अटक केली होती. साहिल खानला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. साहिल खान हा मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 70 दिवसानंतर साहिल खान जामीन वर बाहेर येणार आहे.

साहिल खान याची अटकपूर्व जामिनची याचिका फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मुंबईतून गोवा, गोव्यातून कर्नाटक, मग हैद्राबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचे पथकही त्याच्या मागावर होते. हैद्राबादहून साहिल खान हा छत्तीसगड येथील जगदलबपूर येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी मुंबईला आणण्यात आलं होतं. आता त्याला अखेर जामीन मिळाला आहे. साहिलच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायाधीशही फेटाळू शकलेले नाहीत.

न्यायालयाने सांगितलं की साहिलच्या विरोधात प्राथमिक दृष्ट्या कोणताही गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. साहिलचे वकील रिझवान मर्चंट यांनी बचावात सांगितलं की, केवळ साहिल खानच नाही, तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लायन बुक वेबसाइटची जाहिरात केली, परंतु त्यांच्यापैकी कोणाचेही नाव एफआयआरमध्ये नाही किंवा त्यांना अटकही झालेली नाही. बहुतांश आरोप हे केवळ अनुमानाच्या आधारे करण्यात आले असून त्यांना पुराव्यांचा आधार नाही.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने खान यांनी सादर केलेला युक्तिवाद मान्य केला आणि म्हटले की एफआयआरमध्ये आरोप केलेल्या गुन्ह्यांचा प्रथमदर्शनी खटला स्थापित करण्यासाठी तपास यंत्रणेने अभिनेत्याविरूद्ध कोणतेही ठोस पुरावे गोळा केलेले नाहीत.

महादेव बेटिंग या ॲपशी संबंधित 67 बेटिंग संकेतस्थळे असून ती सर्व परदेशातून नियंत्रित केली जात असल्याची माहिती तपासावेळी समोर आली होती. या ॲप्सची सूत्रे हलवण्यासाठी दोन हजारहून अधिक बनावट सिमकार्ड वापरली गेली. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले गेले. त्याचप्रमाणे, बनावट कागदपत्रांच्या आधारावर उघडलेली 1700 हून अधिक बँक खाती पैसे गोळा करण्यासाठी वापरली गेली. त्यानंतर, पैसे हवाला आणि कूटचलनाद्वारे (क्रिप्टोकरन्सी) वळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img