Karan Johar: बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता म्हणून करण जोहरला (Karan Johar) ओळखलं जातं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत करण जोहरने बरेच खुलासे केले आहेत. करण जोहर हा अविवाहित असून सात वर्षांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. त्याच्या मुलांची नाव रुही आणि यश अशी आहेत. करणला त्याच्या लव लाईफबद्धल बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. एका शोमध्ये संवाद साधताना करणने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्धल वक्तव्य केलं आहे. वयाच्या चाळीशीमध्ये त्यालाही जोडीदारजी गरज भासत होती. पण, पन्नाशी पार गेल्यानंतर त्याने जोडीदार शोधणं बंद केलं. यामागे बरीच कारणं असल्याचं करणने या मुलाखतीत सांगितलं आहे.
Karan Johar: करण जोहर म्हणतो, “मी गेल्या बऱ्याच काळापासून सिंगल आहे. मी कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाही आहे. खरं बोलायचं झालं तर, आतापर्यंत माझ्या संपूर्ण आयुष्यात मी फक्त आणि फक्त दीड वर्षंच रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. पण, मी आता सिंगल असल्याचा मला किती आनंद आहे हे मी तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. आणि आता भविष्यातसुद्धा मी रिलेशनशिपमध्ये कधी पुन्हा येईन असंसुद्धा मला अजिबात वाटत नाहीये. माझी पर्सनल स्पेस, बाथरूम, बेडरूम कोणासोबत तरी शेअर करणं या गोष्टी मी आता विसरूनच गेलोय. आता फक्त माझा दिवस आई आणि माझ्या मुलांपासून सुरु होतो ते त्यांच्यासोबत वेळ घालवण्यातच संपतो.”
Karan Johar: “मी जेव्हा ४० वर्षांचा झालो तेव्हा मला खरं तर जाणवायचं की आयुष्यात जोडीदार असायला हवा… पण, जेव्हा मी पन्नाशी पार केली त्या दिवसांपासून मला माझ्या आयुष्यात आता अजून कोणीच नको असं वाटू लागलं. कोणाला डेट करणं, देशातील किंवा देशाबाहेरच्या लोकांना जाऊन भेटायचं या सगळ्या परिस्थितीतून मी गेलो आहे. मी सर्व काही अनुभवलं आहे. मात्र, इथून पुढे मला खरंच कोणी योग्य वाटत असेल तर ठिके… नाहीतर मला जोडीदार असायला हवा याची गरज अजिबात वाटत नाही.” असं स्पष्ट मत निर्मात्याने मांडलं आहे.
दरम्यान, याव्यतिरिक्त करणच्या कामाबद्धल बोलायचं झालं तर, सात वर्षाच्या ब्रेकनंतर करण जोहरने मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केलं. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता धर्मा प्रोडक्शनचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट येत्या १९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकी कौशल व तृप्ती डिमरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.