Juices For Skin: प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर आणि टवटवीत हवी असते. यासाठी आपण बरेच उपायदेखील करतो. त्वचा चमकदार ठेवण्यासाठी लोकं विविध प्रकारचे सौंदर्य उत्पादनाचा वापर करतात. या उत्पादनांमध्ये रसायने असतात. याच्यामुळे त्वचेचे नुकसान होते. सौंदर्यासाठी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपल्या त्वचेला खोल पोषण आणि निरोगी त्वचा ठेवण्यासाठी आहारात काही फळांच्या रसाचा वापर केला पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन जास्त असलेले पदार्थ खाणं खूप गरचेचं आहे. आपल्याला ग्लोइंग स्किनसाठी चांगल्या आहाराचं सेवन केलं पाहिजे. वेगवेगळ्या फळांचे ज्यूस सुद्धा आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. आपल्या स्किनला याने बऱ्याच प्रमाणात फायदे मिळतात, फक्त तुमची त्वचाच चमकदार राहण्यास मदत होत नाही तर हे आपल्या आरोग्यासाठीसुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतं.
टोमॅटो ज्यूस
Juices For Skin: टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन ए (Vitamin A), फायबर (Fiber), फोलेट आणि अँटीऑक्सीडेंट देखील असते. त्यामुळे आपल्या त्वचेला याचा मोठा फायदा होतो. त्वचेमधील रेडिकल डॅमेज याने भरून निघते.
बीट ज्यूस
बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच अँटीऑक्सिडंट्सची उच्च पातळी असते. बीटरूटचा ज्यूस पियाल्याने आपल्याला व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मिळते. सूर्याच्या किरणांमुळे होणाऱ्या स्किनच्या समस्या दूर होतात. चेहऱ्यावरील ओपन फोर्स कमी व्हायला मदत होते.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने ‘या’ आजारांवर होईल मात
गाजरचा ज्यूस
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी गाजराचा ज्यूस खूप फायदेशीर मानला जातो. डोळ्याची नजर आणखी तीक्ष्ण होते. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सीडेंट असते. याने त्वचेवरील काळी वर्तुळे, डाग, मुरूम या समस्या दूर होतात आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
कारल्याचा ज्यूस
मान्य आहे कारलं चवीला फार कडू असतं. त्यामुळे बरेच काही लोक कारल्याच सेवन करत नाहीत. मात्र कारलं आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी मानलं जातं. डायबिटीज असलेल्या लोकांनी आहारात नेहमीच कारल्याचा समावेश केला पाहिजे. कारल्याचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, डार्क सर्कल्स, ओपन फोर्स, ब्लॅकहेट्स सर्व काही दूर व्हायला मदत होते.
टीप: या बातमीमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.