मुंबई
आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) T20 मालिकांमध्ये भारतीय संघाने आज तिसऱ्या T20 सामना जिंकला आहे. T20 संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या तडफदार फलंदाजीमुळे भारतीय संघाने झिम्बाब्वे समोर 182 रनाचे लक्ष ठेवले होते.
भारताच्या शुभमन गिलने धडाकेबाज अर्धशतक झळकावल्यानंतर गोलंदाजी मध्ये वॉशिंग्टन सुंदरने 3 बळी पाडून झिम्बाब्वेचा पूर्णपणे धुव्वा उडवला. ह्या विजयासह मालिकेमध्ये भारत २-१ च्या सरासरीने जिंकून ही T20I मालिका आपल्या नावावर केली आहे.
टीम इंडियाला 200 पार धावा नेता आल्या नाहीत. भारताने 20 षटकात 4 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात शुबमन गिल याने सावध कॅप्टन इनिंग खेळली. 49 चेंडूत 134 च्या स्ट्राईक रेटने 66 धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यात फेल गेल्यानंतर त्याने अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली खरी पण त्याचा रेपो कायम ठेवता आला नाही. नंतर त्याच्या स्ट्राईक रेट खूपच कमी झाला. त्याने 27 चेंडूत 36 धावा केल्या. यात 4 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, अभिषेक शर्माकडून या सामन्यात मोठी अपेक्षा होती. मात्र भ्रमनिरास झाला. 9 चेंडूत 10 धावा करून तंबूत परतला.
ऋतुराज गायकवाडने एक बाजू सावरून धरली. तसेच जबरदस्त 175 च्या स्ट्राईक रेटने प्रहार केला. पण त्याचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. रिंकु सिंह 1 चेंडू खेळत नाबाद 1 धाव, तर संजू सॅमसन 7 चेंडू खेळत नाबाद 12 धावांवर राहिला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुझराबानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या व्यतिरिक्त एकही गोलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.