23.1 C
New York

Gautam Gambhir : गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Published:

माजी सलामीवीर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या(Team India) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची पृष्ठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी केली. या भूमिकेत गौतमने राहुल द्रविडची जागा घेत टी-२० विश्वचषकात नुकताच मिळालेल्या यशाच वेग कायम ठेवण्याच आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतमची पहिली नियुक्ती श्रीलंकाविरुद्धची आगामी लिमिटेड ओव्हर्स मालिका असेल. भारतीय क्रिकेट संघ २७ जुलै पासून ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. गंभीरने पदभार स्वीकारल्यानंतर , भारतीय संघ सर्वोच्च स्तरावर कामगिरी करत राहील याची खात्री करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ठ राहील.

राहुल द्रविडचा दिलदारपणा; इतक्या कोटींच्या बोनसवर सोडलं पाणी

भारताच्या २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावणारा एक कुशल खेळाडू गंभीर, अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सला त्यांचा मार्गदर्शक म्हणून आयपीएल २०२४ चा विजेतेपद मिळवून दिल. गौतम गंभीर हे त्यांच्या वर्तनासाठी ओळखले जातात, गंभीरने समालोचनाचे काम केले व नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून सुद्धा काम केले. जर आपण भूतकाळाकडे पहिल तर गॅरी कर्स्टन, राहुल द्रविड आणि डंकन फ्लेचर यांच्यासारखा शांत आणि संयोजित प्रशिक्षकांना संख्या पसंती दिली जात होती, परांतु आता कामान गौतम गंभीरकडे दिल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींना एक वेगळीच ऊर्जा दिसून येणार आहे. गौतम गंभीर हा अश्या काही भारतीय क्रिकेटपटूनपैकी एक आहे जो स्टार खेळाडूंच्या दृष्टिकोनातून खेळ पाहत नाही तर सर्वांना सामान वागणूक देऊन त्यांना शिकवण देतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img