23.1 C
New York

Reservation : मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करू नका, वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

Published:

मुंबई

मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा (Reservation) प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमीका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही. खरं तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आंदोलकांना काय आश्वासन दिले हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले नाही. मुख्यमंत्री अधिवेशन सुरू असताना आरक्षणप्रश्नी बैठक बोलावतात. त्यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत. त्यामुळे गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, महायुतीचे पितळ उघडे पडेल या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा थयथयाट सुरू आहे. महायुतीत 200 च्यावर आमदार आहेत. तरी देखील आरक्षाचा प्रश्न महायुती सरकार सोडवत नाही. उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही.

विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असं सांगितले होते मात्र आतापर्यंत आरक्षण मिळाला नाही. सरकारकडे पाशवी बहुमत आहे. मात्र तरीही देखील सरकार कोणतीही भूमिका घेत नाही. सरकार दोन्ही समाजांना मुद्दाम झुलवत ठेवलं आहे असा हल्लाबोल आज विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, याचबरोबर हाके यांचं उपोषण स्थगित करायला गेलेले सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तिथे प्रक्षोभक वक्तव्य केले त्यामुळे ते तिथे वाद मिटवायला गेले होते की वाढवायला गेले होते का? तसेच भुजबळांना कोणाविरुद्ध तलवार काढायची होती? असा सवाल देखील त्यांनी वेळी उपस्थित केला. जेव्हा विरोधकांची गरज होती तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावलं नाही मात्र आता त्यांना निर्णय घेण्यापासून कोणी रोखल नसतानाही ते आता आम्हाला बोलवत आहेत मात्र आम्ही तुम्ही जे काही आश्वासन दिले आहे ते अधिवेशनात मांडा अशी भूमिका घेतली आहे असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img