7.3 C
New York

Manoj Jarange : बीड पोलिसांची जरांगेंच्या सभेला परवानगी नाही; काय आहे कारण ?

Published:

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची गुरुवारी (11 जुलै) बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी (Beed Police) परवानगी दिलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर सभा घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडून मराठा समन्वयकांना करण्यात आलेली आहे. समाज बांधवांची गर्दी पाहता गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांची परवानगी नाही. परंतु यावर बैठक घेऊन पोलीस प्रशासन तोडगा काढणार आहे.

सरकार मराठा आरक्षणाचा गेम तर करीत नाही ना? जरांगे म्हणाले…

Manoj Jarange आठ तारखेलाच शांतता रॅलीला परवानगी दिली- धनंजय मुंडे

जरांगे यांच्या बीडमधील रॅलीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात अधिक माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यात मराठा समाजाने शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. पण प्रशासनाने या रॅलीला परवानगी नाकारली अशी अफवा पसरवण्यात आली आहे. पण सत्यस्थिती अशी आहे की 8 तारखेला या शांतता रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. मी मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. म सुद्धा त्यांच्या लढ्यात सामील झालो होतो, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच शांतता बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img