मुंबई
मुंबई पोलिसांनी अखेर वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run) सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतल्या वरळीमध्ये भरधाव कारनं कोळी दाम्पत्याला उडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला (Mihir Shah) अखेर अटक करण्यात आली आहे. मिहीरसह 12 जणांना शहापूरमधून अटक (Arrest) करण्यात आली आहे. या घटनेनंतर तब्बल 72 तासांनी मिहीरला अटक करण्यात आली आहे. मिहिर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी (Mumbai Police) घेतलं ताब्यात घेतलं आहे.
मिहीर हा शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. आरोपीनं BMW कारनं या दम्पत्याला उडवण्यापूर्वी काही तास आधीचं एक बिल व्हायरल झालं आहे. 18,730 रुपयाचं हे दारुचं बिल असल्याची माहिती तपासात उघड झालीय. या घटनेनंतर मिहीर फरार असून त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन करण्यात आली होती. मिहीर शहाचे वडील राजेश आणि त्याचा ड्रायव्हरला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलीय. या दोघांवर मिहीरला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून ज्याचा शोध घेत होते तो मुख्य आरोपी मिहीर शाह अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. मिहीर शाह याने भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होती. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत नेलं होतं. त्याने धडक दिल्यानंतर गाडी थांबवली असती तर महिलेचे प्राण वाचू शकले असते. पण आरोपीने गाडी न थांबवता त्याने दूरपर्यंत महिलेला फरफटत नेलं. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे सोडून पळून गेला होता. त्याने तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्यासोबत फोनवर बातचित केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आरोपी मिहीर शाह याने फोन स्विट्च ऑफ केला आणि तो पळून गेला होता. पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता.