3.7 C
New York

Sabhapati Election : सभापती निवडणूक घ्या, मविआच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Published:

मुंबई

विधान परिषदेचे सभापती पद (Vidhan Parishad) गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. सरकारकडून या संदर्भात निवडणूक घेण्यात येत नाही आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विधान परिषदेतील आमदारांनी सभापती निवडणूक (Sabhapati Election) व्हावी याकरिता आज राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेतली आहे. तसेच सरकारला सभापती निवडणूक घेण्यासंदर्भात सूचना देण्याची देखील मागणी राज्यपाल यांना केली आहे.

सभापती निवडणूक घेण्यात यावी याकरिता महाविकास आघाडीचे नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, आमदार जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, आमदार सत्यजित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि आमदार उपस्थित होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img