मंत्रालयात एका (Mantralaya) व्यक्तीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. काम होत नसल्याने संतापलेल्या या व्यक्तीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून या व्यक्तीचे सुरुवातीला मनधरणीचे प्रयत्न केले गेले. पण संबंधित व्यक्ती ऐकून घेण्याच्या मनस्थीत नव्हती. आपलं काम होत नसल्याने या व्यक्तीने मंत्रालयाच्या थेट पाच मजल्यावरुन खिडकीतून बाहेर पडत स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अग्निशामक दल आणि पोलिसांकडून या व्यक्तीला वाचवण्याचे प्रचंड प्रयत्न झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात काम होत नसल्यामुळे पाचव्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर सज्जावर येऊन बसण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलीस या वृद्ध व्यक्तीची समजूत काढत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात