23.1 C
New York

Kalyan : ‘ती’ जादू पुन्हा दाखवा अन्यथा.. कल्याणमधील पाणी प्रश्नावर मनसेचा इशारा

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

पावसाचा जोर सध्या सगळीकडं वाढतोय. पण, ऐन पावसाळ्यातही कल्याण (Kalyan) ग्रामीणमधील पाणी प्रश्न (Kalyan Water Issue) ज्वलंत आहे. या प्रश्नानवर मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patal) यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan Dombivli Municipal Corporation) आयुक्तांसोबत बैठक घेतली. लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) दोन महिने आधी जादू दाखवून पाणी पुरवठा करण्यात आला. तशीच जादू आत्ता दाखवा. पाण्याच्याबाबतीमध्ये एमआयडीसी चालूगिरी करीत आहे. पाणी प्रश्न सुटला नाही तर एमआयडीसीवर विशाल मोर्चा काढू असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. 

कल्याण- डोंबिवली शहरात पाणी समस्या गंभीर होत असून पालिका कार्यालयावर, एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. त्रस्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारूनही पाणी समस्या सुटली नाही. माझे एवढेच म्हणणे आहे कि, लोकसभा निवडणूकिच्या आधी दोन महिने जी जादू करून नागरिकांना पाणी दिले तीच जादू करून आताही नागरिकांना पाणी दया असे मनसे आमदार प्रमोद राजू पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पाणी समस्येबाबत घेण्यात आलेल्या या बैठकीत आमदार पाटील यांनी नागरिकांना योग्य दाबाने पाणी पुरवठा करा असे सांगितले.पालिका प्रशासन, एमआयडीसी हे पाणी पुरवठा करत असून यात अमृत योजना आल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे वाटते. मात्र एमआयडीसी विभाग नेहमीच पाणी पुरवठा करणारे खोटे आकडे देत असल्याने जनतेचा रोष हा एमआयडीसीवर आहे. पालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माहिती दिली. काही ठिकाणचे अमृत योजनेचे काम थांबले असून ते गतिमान कसे करता येईल त्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.

सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर पाणी समस्येबाबत मनसे एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढू. विधानसभेत तर अनेक वेळेला बोललो आहें कि कल्याण – डोंबिवलीचे हक्काचे 140 एमएलडी पाणी कोटा आहे तो पळविण्याचा घाट काही लोकांचा चालला आहे. तसेच अमृत योजनेचे 105 एमएलडी मिळावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. तो साठा तरी कल्याण डोंबिवलीला मिळावा यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीही उपस्थित केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img