7.6 C
New York

Mumbai Railway Station : ‘या’ रेल्वे स्थानकांचे नाव बदलणार विधान परिषदेत ठराव मंजूर

Published:

मुंबई

महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) मुंबईतील रेल्वे स्थानकांची (Mumbai Local) नावं बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उपनगरातील 7 रेल्वे स्थानकांची (Mumbai Railway Station) नावे बदलण्याचा निर्णय महायुती (MahaYuti) सरकारने काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स, चर्नी रोड आणि हार्बर रेल्वेमार्गावरील कॉटन ग्रीन, डॉकयार्ड आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. यानंतर आता मुंबईतील सात रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत (Legislative Council) मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यातही आला आहे.

ब्रिटिश काळात लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून एल्फिन्स्टन रोड हे नाव स्थानकाला देण्यात आलं होतं. पण, रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर जुलै 2017 मध्ये नामांतराचे परिपत्रक काढण्यात आले आणि त्यानंतर एल्फिनस्टन स्थानकाचं नाव प्रभादेवी असं करण्यात आले आहे.​ यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधी मध्य रेल्वेच्या करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स, चर्नी रोड आणि हार्बर रेल्वेमार्गावरील कॉटन ग्रीन, डॉकयार्ड आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

या प्रस्तावानुसार करी रोड स्टेशनचे नाव बदलून लालबाग, सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी, मरीन लाइन्सचे मुंबादेवी आणि चर्नी रोडचे नाव बदलून गिरगाव केले जाईल. सँडहर्स्ट रोड स्टेशनचे नाव सेंट्रल मार्गासोबतच हार्बर लाइनवरही बदलले जाईल. अन्य स्टेशन्समध्ये कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव बदलून काळाचौकी, डॉकयार्ड रोडचे माझगाव आणि किंग सर्कलचे नाव तिर्थंकर पार्श्वनाथ केले जाईल. मुंबईमध्ये याआधीही अनेक स्टेशन्सची नावे बदलली गेली आहेत. जसे की, ऐतिहासिक स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोडचे नाव बदलून प्रभादेवी केले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img