20.9 C
New York

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला मिळाला ICC चा ‘हा’ बहुमान

Published:

भारताचा भरवशाचा गोलंदाज म्हणून नावलौकिक असलेला जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कायमच आपली छाप सोडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पेर्धेमध्येदेखील त्याने आपली चुणूक कायम ठेवली. याच पार्श्वभूमीवर त्याला ICC चा प्लेअर ऑफ द मंथ (ICC Player of the month) हा बहुमान नुकताच घोषित करण्यात आला. बुमराहने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजला हा पुरस्कार मिळवण्यासाठी मागे टाकले.

जसप्रीतने यू.एस.ए आणि कॅरिबियन मध्ये झालेल्या विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी बजावली ज्यात त्याने ८.२६ च्या सरासरीने १५ गडी बाद केले. पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दोन वेळा पत्करून तो भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या बरोबरीस सामील झाला आहे.

याबरोबरच भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनादेखील सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध स्मृतीने चांगली कामगिरी केली. या दरम्यान तिने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. याचेच बक्षीस म्हणून आयसीसीने ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून स्मृतीची निवड केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img