13.1 C
New York

Hardik Pandya: ‘४ वर्षांचा संसार’, अन् हार्दिक पंड्या-नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाला दुजोरा?

Published:

Hardik Pandya: हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovik) गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फारच चर्चेत आहेत. या दोघांमधला वाद वाढला असून लवकरच दोघे घटस्फोट घेणार असल्याचं म्हंटल जातंय. हेच नव्हे तर नताशा स्टॅनकोविक ही गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये देखील दिसली नाहीये.भारतीय संघाने T20 वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण देशभरात पूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. देशभरात आनंदाचा गाजावाजा झालेला पाहायला मिळाला. मात्र, हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिने सोशल मीडियावर एकसुद्धा पोस्ट शेअर केली नव्हती. हार्दिक पंड्याने मात्र या सामन्यात चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं.

Hardik Pandya: गेल्या बऱ्याच दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या सतत घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता हार्दिक आणि नताशा यांच्याबद्धलची अत्यंत मोठी अपडेट समोर आलेली आहे. हार्दिक आणि नताशाच्या अगदी जवळच्या व्यक्तीने याबदल भाष्य केलं आहे आणि अखेर त्या दोघांमध्ये कोणतं वादळ आलंय हे सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये बरेच वाद सुरु आहेत आणि दोघांचे हे वाद मिटवायची इच्छा नाही आहे. हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविकच्या खास व्यक्तीने सांगितलं की, मुख्य म्हणजे हार्दिकच्या काही गोष्टींवर नताशा फार नाराज आहे. एवढंच नाही तर नताशाला या नात्यामध्ये राहायची काहीच इच्छा राहिली नाहीये. आणि हार्दिक पंड्यालासुद्धा पॅचअप करण्याची काहीच इच्छा नाहीये.

 खरोखरच मदत करायची असेल तर, “लाडकी बहीण” योजनेची गरज नाही

Hardik Pandya: इतकंच नव्हे तर त्याने म्हंटल की, कोणालाच काहीच माहिती नाहीये की पुढे नेमकं काय होणार आहे. त्यांच्या सध्याच्या परिस्थितीमधे दोघांमधले वाद मिटवण्याची चिन्ह अजिबात दिसत नाहीयेत. इतक्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे हार्दिक आणि नताशा या दोघांनी या परिस्थितीवर भाष्य करणं टाळल्याचं पाहायला मिळतंय. दोघेसुद्धा यावर काहीच बोलत नाही आहेत. नताशा स्टॅनकोविकने हार्दिक पंड्याशी लग्न व्हायच्या आधी टीव्ही अभिनेता अली गोनी (Ali Goni) याला डेट केलं. हे दोघे रिलेशनमध्ये होते मात्र फार काळ टिकलं नाही. यानंतर नताशाने हार्दिक पंड्याला डेट करण्यास सुरुवात केली. नताशा स्टॅनकोविक ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. नुकतंच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या पार्टीलाही नताशा हार्दिक सोबत दिसली नव्हती. सध्या लगातार घटस्फोटाच्या चर्चा असताना नताशा सोशल मीडियावर स्वतःचे फोटोस किव्हा व्हिडिओ शेअर करताना दिसत असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img