21 C
New York

Salman Khan : सलमानच्या घरावर गोळीबार का केला? कारण ऐकून पोलीस चक्रावले

Published:

मुंबई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात 1 हजार 736 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. (Salman Khan House Firing) या चार्जशीटमध्ये एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित बिश्नोई टोळीबाबत (Lawrence Bishnoi) खुलासा करण्यात आला आहे.

उत्तर-पश्चिम भारतात यश मिळवल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने महाराष्ट्रातही आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. बिश्नोईने सलमान खानला धमकावून पैसे उकळण्याच्या उद्देशाने लक्ष्य केले, जेणेकरून तो खंडणीचा धंदा पुढे नेऊ शकेल. एका अधिकाऱ्याने सांगितले की आरोपपत्रात बिश्नोईची या प्रकरणात सक्रिय भूमिका कशी आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे जमा केले आहेत.

पोर्तुगालमधून एक फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये ही घटना घडवून आणण्याची जबाबदारी घेण्यात आली होती, असेही आरोपपत्रात उघड झाले आहे. अनमोल बिश्नोई आणि अटक आरोपी यांच्यातील संभाषणाचे 3-5 मिनिटांचे रेकॉर्डिंगही या आरोपपत्रात जोडण्यात आले असून फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान अनमोल बिश्नोईच्या आवाजाचे नमुने जुळल्याचे सांगण्यात आले आहे.

बिष्णोई टोळीकडून सततच्या धमक्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांना भीतीच्या वातावरणात राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या धमक्या भडकवण्यासाठी त्याने काहीही केले नसून केवळ त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी या धमक्या दिल्या जात असल्याचा सलमानने दावा केला आहे. त्याने गेल्या काही वर्षांतील अनेक घटनांचे वर्णन केले, ज्यात धमकीचे ईमेल, संदेश, त्याच्या निवासस्थानाबाहेर ठेवलेल्या नोट्स आणि त्याच्या घरी गोळीबाराची घटना घडल्या आहेत.

दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये 6 अटक आरोपी आणि 3 फरार अरोपी आहेत. ज्यामध्ये अनमोल बिष्णोई, लॉरेन्स बिष्णोई आणि रोहित यांची देखील नावे आहेत. त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करत बिष्णोई गँगला मुंबई आणि बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं होतं आणि खंडणीचं रॅकेट महाराष्ट्रात चालवायचं होतं. याचा खुलासा चार्टशीटमध्ये करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img