26.6 C
New York

Dark Chocklate: डार्क चॉकलेट खाल्ल्याने ‘या’ आजारांवर होईल मात

Published:

Dark Chocklate: कोणतही चॉकलेट असूदेत त्याची चव कोणाला आवडत नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत चॉकलेट हे सर्वानाच खायला आवडत. चॉकलेटमध्ये आता विविध व्हरायटी आल्या आहेत. मग ते व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट, नाही तर ड्रायफ्रुट्स मिक्स असलेले चॉकलेटच्या व्हरायटी बाजारामध्ये उपलब्थ आहेत. दरवर्षीप्रमाणेच वर्ल्ड चॉकलेट डे ७ जुलै रोजी साजरा केला जातो.

Dark Chocklate: जास्त गोड खाऊन नये किंवा चॉकलेट जास्त प्रमाणात खाल्ल्याने दात किडतात, दातांना किड लागून दात खराब होतात असं मोठी माणसं लहान मुलांना नेहमीच सांगत असतात. मात्र, तुम्हाला हे माहितेय का? चॉकलेटचं सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. डार्क चॉकलेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन आणि जीवनसत्वे असतात. नेमकं कोणकोणत्या आजारांवर डार्क चॉकलेट काम करतं? हे जाणून घेऊया.

हृदयाच्या समस्यांवर फायदेशीर
ज्या व्यक्तींना हृदयासंबंधीत आजार असतील त्यांनी डार्क चॉकलेटचं सेवन केलं पाहिजे. कारण डार्क चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सीडेंट असतं. डार्क चॉकलेटमुळे व्यक्तीच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयाच्या विविध समस्यांपासून आपला बचाव होतो.

बुद्धीसाठी उपयुक्त
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या बुद्धीवर होतो. याने आपल्या मेंदूला व्यव्स्थितप्रमाणे रक्त पुरवठा होतो. मेंदू कायम तल्लग राहतो. तसंच विस्मरण किंवा काही गोष्टी न लक्षात राहणं, विसरून जाणं अशा समस्यांपासून आपला बचाव होतो. ज्या लोकांना गोष्टी लक्षात राहत नाही किंवा विसरायला होतात त्यांनी डार्क चॉकलेट खाल्लंच पाहिजे.

त्वचा मुलायम राहते
अनेक लोकांना उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटी ऑक्सिडंट असतं. त्याने सूर्यकिरणांमुळे त्वचेवर येणारे डाग किंवा पुरळ कमी होण्याची शक्यता असते. काही महिलांना सनस्क्रीनचं लोशन सूट होत नाही त्यामुळे अशावेळी तुम्ही डार्क चॉकलेटचं सेवन केल्यास त्वचेसाठी उत्तम असेल.

चहुबाजूने दूधगंगा! हा धबधबा पाहून भारावून जाल

जलद ऊर्जा देते
ज्या लोकांचा बीपी कमी होत असेल किंवा तुम्हाला अस्वस्थता आणि सुस्ती येत असेल तर डार्क चॉकलेट तुमच्या ऊर्जेची पातळी वेगाने वाढवू शकते. डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन आणि थिओब्रोमाइन विशिष्ट प्रमाणात असतं त्यामुळे आपली ऊर्जा वाढवण्यास मदत करते.

सर्दी आणि खोकला प्रतिबंध
बदलत्या हवामानामुळे किरकोळ आजारांना सामोरे जावं लागतं. सर्दी-खोकला हा देखील त्यापैकीच एक आजार आहे. अशा परिस्थितीत सर्दी-खोकला टाळण्यासाठी डार्क चॉकलेटचं सेवन केलं जाऊ शकतं.

टीप : चॉकलेटबाबतच्या या माहितीचा मुंबई आऊटलुक दावा करत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img