18.7 C
New York

CNG Price Hike : सीएनजी, पीएनजी महाग, गृहिणींचे बजेट कोलमडणार

Published:

मुंबई

महानगर गॅस लिमिटेडने ‘सीएनजी’ (CNG) आणि घरगुती ‘पीएनजी’च्या (PNG) किंमतीत (CNG Price Hike) वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात येणार आहेत. ‘सीएनजी’ 1.50 रुपयांनी, तर ‘पीएनजी’ 1 रुपयाने महाग झाला आहे.

मुंबईकरांना नव्या दरानुसार 1 किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा ‘सीएनजी’वर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे. तसेच, ‘पीएनजी’ दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रकही कोलमडू शकते.

देशांतर्गत सीएनजी आणि पीएनजीच्या वापराचे वाढते प्रमाण तसेच घरगुती गॅस वाटपात येणारा तुटवडा यामुळे, महानगर गॅस लिमिटेडला जादा बाजारभावाने नैसर्गिक वायू आणावा लागत आहे. परिणामी गॅसची किंमत वाढल्याचे एमजीएल कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img