4 C
New York

Devendra Fadnavis : फडणवीसांनी घेतली राज्यपाल बैसंची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

Published:

मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी देखील राज्यपाल यांचे भेट घेतली आहे. त्यामुळे या दोन भेटीगाठींची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चांगली चांगली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आधी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीसाठी 12 नावे राज्यपालांना सुचवली आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती अजूनही झालेली नाही. विशेष म्हणजे हा वाद ठाकरे सरकार असल्यापासूनचा होता. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारकडून सुचवण्यात आलेल्या नावांची नियुक्ती केली नव्हती. या मुद्द्यावरुन ठाकरे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यात राजकीय संघर्ष देखील बघायला मिळाला होता. यानंतर आता महायुती सरकारचे शेवटचे सहा महिने उरले आहेत. या अंतिम कालावधीत राज्यपाल नियु्क्त 12 आमदारांची नियुक्ती व्हावी, तसेच आपण सुचवलेली नावे नियुक्त व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची आज भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते देखील राजभवनात जाताना दिसले. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानेदेखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना विधान परिषदेच्या सभापतींची निवड याच अधिवेशनाच्या काळात व्हावी अशी विनंती केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img