रमेश औताडे, मुंबई
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिन १ ऑगस्ट २०२४ पासून पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या सदस्यता अभियानाला राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते (Bhimshakti Mahayatra) अभियानाची सुरवात करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ पासून दीक्षाभूमी ते चैत्यभूमी शिवशक्ति (Shivshakti) – भीमशक्ति (Bhim Shakti) आशिर्वाद महायात्रा पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सांविधान सन्मान लॉगमार्च प्रणेते, जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे. अशी माहिती मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच लाँगमार्च प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते या यात्रेची सुरवात करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीतून कमीत कमी १० विधानसभा लढवणार तशी मागणी महायुतीतील नेत्यांना केली आहे.अशी माहिती युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी यावेळी दिली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी शिवसेनेसोबत महायुतीत सहभागी आहे परंतु अजुन पर्यंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सत्तेत कोणताही वाटा मिळाला नाही म्हणून राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे . त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीला महायुती सरकार मधे सत्तेत योग्य वाटा मिळावा व रिपब्लिकन चेहरा म्हणुन राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाड़े यांना विधान परिषद वर संधी देऊन मंत्रिमंडळात सहभागी करावे अशी मागणी केली आहे.