23.1 C
New York

Assembly Elections : विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची चिन्हे; ‘या’ बड्या नेत्यांमध्ये चर्चा

Published:

मुंबई

लोकसभेनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) करिता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि महायुती (Mahayuti) अशा दोन आघाड्या आहेत. मात्र आता या विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhansabha Eletion) राज्यात नवीन एका आघाडीचा (Third Front) उदय होण्याची शक्यता आहे. मुंबईत या आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्यातील प्रमुख दोन आघाडी असलेल्या पक्षांसाठी डोकेदुखी करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या आघाडीचा उदय होणार आहे. या आघाडीमध्ये प्रामुख्याने संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू आणि शेतकरी युवा नेते रविकांत तुपकर हे या नवीन आघाडीचे नेतृत्व करणार आहे. आघाडी संदर्भात प्राथमिक चर्चा तिन्ही नेत्यांमध्ये झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी झाली तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या आहेत. पण आगामी निवडणुकीत मात्र तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. मध्यंतरी संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातीलस विविध भागात दौरा केला होता. संभाजीराजे यांच्याची तरूणवर्ग मोठ्या प्रमाणत जोडलेला आहे. रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन आग्रही असतात. त्यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. शिवाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणुकही लढवली होती. तर बच्चू कडू हे देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. या शिवाय दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी ते आवाज उठवतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जर हे तीन नेते एकत्र आले तर आगामी निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल. शिवाय आघाडी आणि युतीतील नाराज लहान पक्ष आणि संघटना या तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img